भाजपच्या संकल्प पत्रासाठी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक सुरु

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून देशभरामध्ये राजकीय पक्षांद्वारे निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. कोणत्याही निवडणुकांमधला अविभाज्य घटक असणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे काम सध्या देशभरामध्ये सुरु आहे. सर्वच पक्षांकडून मतदार राजाला साद घालण्यासाठी जाहीरनामे बनविण्याचे काम सुरु असून कोणत्या मुद्द्यांद्वारे जनतेला आकर्षित करता येईल यासाठी बैठका सुरु आहेत.

दरम्यान, सत्ताधारी भाजपने देखील संकल्प पत्र अर्थात पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असून आज भाजपच्या जाहीरनामा समितीची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक सुरु झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने कोणत्या मुद्द्यांचा समावेश आपल्या जाहीरनाम्यामध्ये करावा याबाबत चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.