‘महाभारत’मध्ये दीपिका झळकणार द्रौपदीच्या भूमिकेत

मुंबई – रामायणावर ढिगभर सिरीयल आणि सिनेमेदेखील होऊन गेले आहेत. हिंदीबरोबर तमिळ आणि कन्नडमध्येही रामायणावर सिनेमे होऊन गेले आहेत. मात्र अजूनही महाभारतावरवर सिनेमा करण्याचा मोह सिनेनिर्मात्यांना आवरत नाही. आता दक्षिणेतील अईलू अरविंद, मधु मंतेना आणि नमित मल्होत्रा या तीन बड्या निर्मात्यांनी मिळून तीन भागांमध्ये या भव्यदिव्य प्रोजेक्‍टची निर्मिती करायचे ठरवले आहे.


यातच मिळलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात ऋत्विक रोशन तसेच दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार आहे. द्रौपदीच्या भूमिकेत दीपिका पदुकोण झळकणार आहे. दरम्यान, ‘दंगल’फेम नितेश तिवारी आणि “मॉम’ फेम रवि उदयवर यांच्यावर डायरेक्‍शनची जबाबदारी असेल. 2021 ला रिलीज होणाऱ्या या सिनेमासाठी हिंदी, तमिळ, तेलगू या तिन्ही फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

View this post on Instagram

 

as if flowers are ever enough!????

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


एवढेच नव्हे तर हे तीन भागातील “3डी’ “महाभारत’ चक्क हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये असणार आहे. तब्बल 500 कोटी रुपये एवढे प्रचंड बजेट असलेल्या “महाभारत’मधील युद्धाचे प्रसंग दाखवण्यसाठी चक्क हाय एन्ड टेक्‍नोलॉजी वापरली जाणार आहे.

यापेक्षाही मोठा 1000 कोटींचा प्रोजेक्‍ट “महाभारत’ असणार आहे. त्यात मल्याळममधील बडे कलाकार मोहनलाल हे भीमाचा रोल करणार आहेत. पण “महाभारत’चे आणखी तपशील समोर यायचे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.