लखनौ – भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पूनम सिन्हा यांना समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या आघाडीकडून लखनौ लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे पूनम सिन्हा यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाचे नेते राजनाथ सिंह यांचे आवाहन असणार आहे.
लखनौ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर पक्षाचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हे निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस पक्षाने अजून पर्यंत लखनौ लोकसभा मतदारसंघामधून कोणता उमेदवार असेल हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे सध्या तरी लखनौ लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या नेत्या पूनम सिन्हा आणि राजनाथ सिंह यांच्यात सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.