गेल्या २४ तासांत कर्नाटकमध्ये कोरोनाबाधितांची नवी १३ प्रकरणे

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.   गेल्या २४ तासांत कर्नाटकमध्ये कोरोनाबाधितांची नवी १३ प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे कर्नाटकात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६० वर पोहचली आहे. तर आतापर्यंत या विषाणूने १० लोकांचा बळी  घेतला आहे. 

कर्नाटकच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ५ वाजेपासून ते मंगळवारी ५ वाजेपर्यंत १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर या विषाणूपासून ७१ जण बचावले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १० हजार ८१५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ३५३ जणांचा या घातक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ हजार १८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 
तर जगभरात १९.४६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी १.२१ लाख जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ४.६ कोरोनाबादीत रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्नालयातून घरी सोडण्यात आले आहे.  तत्पूर्वी आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता लॉक डाउनच कालावधी ३ मेपर्यंत  घेतला असून कोरोनाविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.