अखेरच्या टप्प्यात देशातील पहिल्या मतदाराचे मतदान

सिमला – लोकसभा निवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यात देशातील पहिल्या मतदाराने हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातल्या मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान नोंदणीमध्ये पहिल्या क्रमांकावरचे 102 वर्षीय शाम शरण नेगी मंडी लोकसभा मतदारसंघासाठी कालपा येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले, तेंव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी उत्साहात स्वागत्‌ केले.

हिमाचल प्रदेशातील किन्नौर या आदिवासी जिल्ह्यातील रहिवासी असलेले शाम शरण नेगी यांचे मतदान राज्याच्या निवडणूक आयोगाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी गोपाल चंद यांनी सांगितले.

नेगी हे निवृत्त शालेय शिक्षक असून त्यांचा जन्म 1 जुलै 1917 रोजी झाला आहे. वयाची शंभरी ओलांदलेल्या नेगी यांच्या नावाची नोंद स्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून करण्यात आली. या घटनेची हकिगत ते अजूनही सांगतात.
देशाची पहिली निवडणूक फेब्रुवारी 1952 साली झाली.

मात्र अतिपावसामुळे मतदान घेण्याविषयी साशंकता वाटल्याने हिमाचलमधील दुर्गम, आदिवासी भागातील मतदान 5 महिने आगोदरच म्हणजे 23 ऑक्‍टोबर 1952 झाले होते. त्यावेळी नेगी शालेय शिक्षक असल्याने त्यांना निवडणूक ड्‌युटी होती. सकाळी 7 वाजता स्वतःचे मतदान करायला गेल्याने ते देशाचे पहिले मतदार ठरले. नेगी यांनी “सनम रे’ या चित्रपटातही काम केले आहे. लोकांनी प्रामाणिकपणे मतदान करावे, असे आवाहन त्यांनी शनिवारीच केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here