पुणे – गेल्या 24 तासांतील करोना बाधितांची संख्या कमी झाली असून, ती 406 झाली आहे. रविवारी नमुन्यांची तपासणी कमी होत असल्याने बाधितांची संख्या कमी दिसत असली तरी ती प्रत्यक्षात कमी झाली नाही, किंवा अद्याप आटोक्यात आली नाही.
सध्या 4 हजार 906 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यातील 262 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. दिवसभरात 415 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, आजपर्यंत 1 लाख 93 हजार 343 जण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोन रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.