गेल्या 17 महिन्यात 76 लाख लोकांना मिळाल्या नोकऱ्या- ईपीएफओ 

नवी दिल्ली – गेल्या 17 महिन्यात 76 लाख लोकांना मिळाल्या नोकऱ्या मिळाल्या असल्याची माहिती ईपीएफओ (एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन) ने दिली आहे. ईपीएफओने जारी केलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात सर्वाधिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. ईपीएफओ सप्टेंबर 2017 पासून आपल्याकडे नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती जारी करत आहे. . देण्यात आलेल्या नवीन यूएएन (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) वरून ही माहिती जारी करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात नोकरी मिळालेल्यांची संख्या 3.87 लाख होती.

गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या 131 टक्के अधिक आहे. हे आकडे केवळ संघटित क्षेत्रात नोकऱ्या मिळालेल्यांचे आहेत
नोकऱ्या मिळालेल्यांमध्ये 22 ते 25 या वयोगटातील युवकांची संख्या सर्वात जास्त (2.44 लाख) आहे. 18 ते 21 या वयोगटातील युवकांची संख्या आहे 2.24 लाख. सध्या ईपीएफओ खातेधारकांची संख्या 6 कोटीपेक्षाही अधिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.