साताऱ्यातील सुरूची राडा प्रकरणातील ५५ जण तडीपार

निवडणुकीच्या तोंडावर पोलीसांचा दणका; तडीपार केलेल्यांना मतदानाची मुभा 

सातारा – लोकसभेच्या मतदानाला केवळ चार दिवस बाकी असतानाच सुरूची राडा प्रकरणातील ५५ जणांना सातारा तालुका हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये दोन्ही राजेंच्या सुमारे ५५ कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,  जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरुची प्रकरणातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक असणार्‍या अनेक कार्यकर्त्यांच्या विरोधात गेल्या चार दिवसांपासून तडीपारीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, ही कारवाई शुक्रवारी तीव्र करण्यात आली. जवळपास ५५ कार्यकर्त्यांना सातारा तालुक्यातून हद्दपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शनिवार दि. २० ते बुधवार दि, २४ रोजी सकाळपर्यंत सातारा तालुक्यात येण्यास कार्यकर्त्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, मतदानादिवशी सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत त्यांना मतदानासाठी शहरात येण्यास मुभा देण्यात आली आहे. हे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी काढले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.