विखेंच्या मंत्रिमंडळातील समावेशाने लोणीत आतषबाजी

राहाता – लोणी गावचे भूमिपुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिमंडळात झालेल्या समावेशाचा आनंद ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून व्यक्त केला. मुंबई येथे राजभवनात सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळ्यात विखे पाटील यांचे पहिल्यांदाच नाव पुकराल्याची बाब शिर्डी मतदारसंघाच्या दृष्टीने अभिमानाची ठरली. ना. विखे पाटील 1995 पासून शिर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत.

आज लोणी येथे कार्यकर्त्यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ढोल-ताशांच्या गजरात फटाक्‍यांची आतषबाजी केली. तसेच एकमेकांना पेढे वाटून शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते काशिनाथ विखे, एम. वाय. विखे, किसनराव विखे, संपतराव विखे, सुभाषराव विखे, रामभाऊ विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, लक्ष्मण विखे, ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के, चांगदेव विखे, आण्णासाहेब म्हस्के, काका धावणे, प्रा. सोपान विखे, भागवत विखे, गोरक्ष दिवटे आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सकाळपासून विखे पाटील परिवारातील सर्वच सदस्य कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या सदिच्छांचा स्वीकार करत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे डॉ. राजेंद्र विखे पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.