भोसरी रुग्णालय खासगीकरणाचा विषय पुनर्विचारासाठी महासभेत 

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने भोसरी येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला असून, हे रुग्णालय खासगी पद्धतीने चालविण्यास देण्याच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी दिली आहे. मात्र, या विषयाला होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन, हा विषय महपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुर्नविचारासाठी सादर केला जाणार आहे.

ऍड. सचिन गोडांबे यांनी हा प्रस्ताव विखंडीत करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यावर महापालिका प्रशासनाने दिलेल्या लेखी पत्रात ही माहिती नमूद केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, मनपाचे भोसरी रुग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यासाठी देण्यास विरोध असल्याची तक्रार प्रशासनाला 21 फेब्रुवारी 2019 रोजी प्राप्त झाली आहे. या तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. या विषयास महापालिका सभेने 4 फेब्रुवारी 2019 रोजी मान्यता दिलेली आहे. मात्र वाढत्या विरोधामुळे हा विषय पुनर्विचारार्थ पुढील तीन महिन्यानंतर महापालिका सभेसमोर सादर करण्यात येईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here