कोरोनाविरोधातील लढ्यात हा ‘सुपरहिरो’ बजावतोय पोलीस व डॉक्टर अशी दुहेरी भूमिका

मालदा – आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी फ्रंट लाईनवरून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. त्यांच्या या साहसाचा सन्मान म्हणून त्यांना कोरोनायोद्धा अशी बिरुदावली बहाल करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाविरोधातील या लढ्यामध्ये एका आयपीएस अधिकारी दोन पाऊल पुढं असल्याचं पहायला मिळतंय.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू असलेले एच एम रेहमान कोरोनाविरोधातील लढ्यात एक पोलीस अधिकारी व डॉक्टर अशी दुहेरी भूमिका बजावत आहेत. रेहमान हे मूळचे एमबीबीएस एमडी डॉक्टर असून त्यांची लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयपीएस अधिकारी पदावर वर्णी लागली आहे.

एक डॉक्टर या नात्याने रेहमान सध्या पोलीस दलातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्याचे काम करत आहेत. आपण निभावत असलेल्या डॉक्टरी भूमिकेबाबत बोलताना रेहमान म्हणतात, “मालदा जिल्ह्यात आतापर्यंत २५० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील २०१ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून १५६ जण सेवेत पुन्हा रुजू झालेत. कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधून त्यांचे मनोबल उंचावण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.”

रेहमान यांनी कोरोनापासून बचावासाठी, ‘पोलीस दलातील वयस्कर कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन ड्युटी न देणे, सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, पोलिसांना आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास त्यांना मार्गदर्शन करणे.’ या उपाययोजना राबवल्याची माहिती दिली.

दरम्यान, रेहमान यांनी आपल्याला कोरोना संकट काळात वैद्यकीय कौशल्य वापरण्याची प्रेरणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आलोक राजोरिया यांनी दिल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.