पिंपळे गुरवमधील सीमाभिंत कोसळण्याच्या स्थितीत

पिंपरी -पिंपळे गुरवमधील विद्यानगर परिसरात एक सीमाभिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

विद्यानगर, पिंपळे गुरव येथील गल्ली क्रमांक एक व दोन मधील पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाच्या इमारतीची सीमाभिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. या भागात लहान मुले खेळत असतात.

तसेच अनेक वृद्धही शतपावली करतात. धोकादायक झालेली ही भिंत कधीही कोसळून शकेल. या दोन्ही इमारतींच्या मालकांना धोकादायक भिंत काढून टाकण्याबाबत नोटीस द्यावी, अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास महापालिका प्रशासन आणि संबंधित इमारतीचा मालक या दोघांवरही कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे प्रभागाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.