निवडणुकीत गुंडगिरी करणाऱ्यांची गय नाही

अनिल वडनेरे : प्रतिबंधात्मक कारवाई

वडूज –
लोकसभा निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासठी पोलिस प्रशासन सरसावले असून खटाव माण तालुक्‍यात येणाऱ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर शांतता भंग होऊ नये म्हणून कलम 107 अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. मात्र या कालावधीत कोणी गुंडगिरी केलीच तर त्याची गय करणार नाही, असा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल वडनेरे यांनी दिला आहे.

निवडणुकीचे वारे आता चांगलेच वाहू लागले असून अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक मोहीम राबविली आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या वाहन तपासणीत अवैध वाहतुक करणाऱ्यांनाही ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. चांगल्या वर्तणुकीचे बॉंड लिहून घेत कलम 110 नुसार ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत अशावर कारवाई करण्यात आली. सतत अवैध दारू विक्री करणारे, पोलिस दप्तरी दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांवर कलम 93 नुसार तडीपारी प्रस्तावित आहे. मारहाण करून दुखापत करणाऱ्या काही जणांविरोधात हद्दपारचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेला आहे.

वडूज पोलिस ठाण्यासह दोन्ही तालुक्‍यातील पोलिस ठाण्यांतर्गत निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासठी पोलिस कर्मचाऱ्यांची पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाची गुन्हेगार, अनोळखी व्यक्ती, अवैध धंदे, बेकायदेशीर वाहतूक यासह गुन्हेगारी वृतीच्या लोकांवर करडी नजर राहणार आहे. काहीजणांवर तात्पुरती तडीपारीची कारवाई केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.