465 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेतलेल्या 62 नागरिकांना दहा दिवसांनंतर रविवारी घरी सोडण्यात आले. 336 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
उपचारांनंतर घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील सात पुरुष, 11 महिला, दोन युवक व दोन युवती, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एक पुरुष, पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील एक पुरुष, सातारा तालुक्यातील कुस येथील दोन महिला, गोडोलीतील दोन पुरुष व एक महिला, शेंद्रे येथील एक महिला, सातारा शहरातील एक महिला, कण्हेर येथील तीन महिला, चार पुरुष व दोन बालके, सातारा शहरातील शनिवार पेठेतील एक महिला व एक बालक, रामकृष्णनगर (सातारा) येथील तीन पुरुष व तीन महिला, अमरलक्ष्मी सोसायटी, संभाजीनगर येथील एक पुरुष, कारी येथील एक पुरुष, वाई तालुक्यातील परखंदी येथील एक बालक, शेंदुरजणे येथील दोन महिला व एक बालक, शाहबाग येथील एक महिला, वाईच्या रविवार पेठेतील एक पुरुष व एक महिला, खटाव तालुक्यातील उंबर्डे येथील एक पुरुष, माण तालुक्यातील दहिवडीतील दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 27, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील नऊ, शिरवळ, खंडाळा येथील 46, रायगाव येथील 22, पानमळेवाडीतील 125, मायणीतील 41, महाबळेश्वरातील चार, खावलीतील 62, अशा एकूण 336 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.