सातारा (प्रतिनिधी) –जिल्ह्यात शनिवारी (दि. 11) रात्री आलेल्या अहवालांनुसार आणखी 94 नागरिक करोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 27 बाधितांना दहा दिवसांनतर रविवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.
जावळी तालुक्यातील 52 वर्षांची महिला, करहर येथील सात वर्षांचे बालक, मरळीतील 82 वर्षांचा वृद्ध, रामवाडी येथील 15, 19, 20 व 23 वर्षे वयाच्या युवती व 12,48, 58, 60 व 27 वर्षे वयाचे पुरुष, कोळेवाडी, ता. माण येथील 36 वर्षांचा युवक, पवारवाडी, ता. कोरेगाव येथील 65 वर्षांचा वृद्ध, लाकवड, ता. महाबळेश्वर येथील 28 वर्षांचा युवक, शिरवळ, ता. खंडाळा येथील 22 वर्षांची महिला, 24 व 25 वर्षांचे पुरुष, सातारा तालुक्यातील शाहूनगर येथील 20 वर्षांचा युवक, जैतापूरमधील 30 वर्षाचा पुरुष, गोडोलीतील भंडारी प्लाझामधील 32 वर्षांचा युवक, निनाम पाडळी येथील 28 वर्षांचा युवक, माळवाडीतील 24 वर्षांचा युवक, जिल्हा रुग्णालयातील 48 वर्षांची महिला कर्मचारी, फलटण तालुक्यातील आंदरुड येथील 52 वर्षांचा पुरुष व अलगुडेवाडी येथील 14 वर्षांची मुलगी, अशा 27 रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रविवारी घरी सोडण्यात आले.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 25, फलटण ग्रामीण रुग्णालयातील तीन, वाई ग्रामीण रुग्णालयातील 38, खंडाळा करोना केअर सेंटरमधील 80, रायगाव सेंटरमधील 56, पानमळेवाडी सेंटरमधील 31, मायणी सेंटरमधील नऊ, महावळेश्वर सेंटरमधील चार व खावली सेंटरमधील 13, अशा एकूण 259 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनसीसीएस व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.