सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 19 नागरिकांना दहा दिवसांनंतर रविवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा तालुक्यातील जिहे येथील 19 वर्षांचा तरुण व 80 वर्षांची महिला, राधिका रोड (सातारा) येथील विमल सिटीतील 27, 30, 48 व 81 वर्षांच्या महिला, कण्हेर येथील 65 वर्षांची महिला, बोरगाव येथील 44 वर्षांची महिला, खटाव तालुक्यातील वडूजमधील 22 वर्षांचा तरुण, वरुड येथील 25 वर्षांचा तरुण, माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील 20 व 24 वर्षांच्या तरुणी, 16 व 27 वर्षांचे तरुण, मार्डी येथील 60 वर्षांची महिला, वाई तालुक्यातील पसरणी येथील दोन पुरुष, वाई शहरातील एक पुरुष व एक महिला, अशा 19 रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना आज टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला.