नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष तीन जागांवर होते. या जागांवर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांची मुले निवडणूक रिंगणात होती. यातील सगळ्यांत लक्षवेधी जागा होती नवी दिल्लीची. येथे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला.
माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित हे देखील या जागेवरून उमेदवार होते. ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. तर, माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचे पुत्र हरीश खुराणा हे मोती नगर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होते. त्यांनी आम आदमी पक्षाच्या शिवचरण गोयल यांचा दारुण पराभव केला आहे. काँग्रेसने या जागेवरून राजेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली होती.