आघाडी करण्याबाबतचा चेंडू आपच्या कोर्टात-कॉंग्रेस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत अनिश्‍चितता कायम असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता चेंडू आपच्या कोर्टात असल्याचे मंगळवारी कॉंग्रेसने म्हटले. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होणार की नाही ते उद्या (बुधवार) स्पष्ट होईल, असे संकेत मिळत आहेत.

आपशी आघाडी करण्याची तयारी दाखवून कॉंग्रेसने मोठे मन दाखवले आहे. 4:3 सुत्रावर केवळ दिल्लीत आघाडी होईल, असे कॉंग्रेस सुत्रांनी नमूद केले. आघाडी झाल्यास दिल्लीतील लोकसभेच्या 7 पैकी 3 जागा लढवायला मिळाव्यात. त्याशिवाय, केवळ दिल्लीपुरतीच आघाडी होईल, अशी ठाम भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे. तर, आपनेच दिल्लीबरोबरच हरियाणातही आघाडी करण्याचा आग्रह धरला आहे. केवळ दिल्लीसाठीच आघाडी झाली तर कॉंग्रेसला फक्त 2 जागा देण्याची तयारी आपने दर्शवली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.