पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत एकूण 746 कॉपीबहाद्दर आढळून आले आहेत. राज्यात दि.18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली.
कॉपीच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष भरारी पथके नेमण्यात आली होती. रसायनशास्त्र व ओ.सी. विषयात सर्वात जास्त 133 प्रकरणे कॉपीची प्रकरणे सापडली आहेत. इंग्रजीमध्ये 82, मराठीमध्ये 53, हिंदीमध्ये 16, भौतिकशास्त्र व एस. पी.-77, राज्यशास्त्र-42, गणित व संख्याशास्त्र-73, जीवशास्त्र व पुस्तपालन लेखाकर्म-103, अर्थशास्त्र-36, विज्ञान पेपर क्रमांक 2-49, इतिहास-65, भूगोल-8, समाजशास्त्र-6, व्यवसाय अभ्यासक्रम-5, मानसशास्त्र व सामान्यज्ञान-2 याप्रमाणे विषयनिहाय कॉपीबहाद्दर सापडले आहेत.
विभागनिहाय कॉपीबहाद्दर
राज्यात नागपूर विभागात सर्वाधिक 143 कॉपी बहाद्दर आढळून आले आहेत. पुणे-111, औरंगाबाद -129, मुंबई-10, कोल्हापूर-38, अमरावती-74, लातुर-127 याप्रमाणे कॉपीची प्रकरणे आढळून आली आहेत. कोकण विभागात कॉपीचे प्रकरण आढळून आले आहेत.