शहरात संततधार पावसाने पालिकेचे पितळ पडले उघडे

रस्ते चिखलमय; नागरिकांना चालणे मुश्‍कील
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

नगर – शहरासह जिल्ह्यात सर्वत्रच पावसाची रिमझिम सकाळ पासून सुरु असून शहरातील शाळा, महाविद्यालयीन परिसरात, मौदानावर, रस्त्यावर सर्वत्रच पाण्याचे डबके साचल्याने विद्यार्थ्यांसह ज्येष्ठनागरिंकांनाही चालने मुश्‍कील झाले आसल्याचे चित्र नगर शहरात दिसत होते.

शहरात गेल्या दोन दिवसापासून संतधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्रच डबके साचले आहे. त्यामुळे शहरात चिडचिड झाली असून पावसाने महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

शहरातील चितळेरोड, दिल्लीगेट, जुने कोर्ट ऑफिस, उपनगरातील भिस्तबाग चौक, बुरुडगाव रोड, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना खड्याचा अंदाज न आल्याने अनेक ठिकानी अपघात होत आहे. तसेच अनेक नागरिक ऑफिसला जाण्यासाठी रेनकोट परिधान करुन, एका हातात छत्री एका हाताने दुचाकीचालवत शहरातील रस्त्यावरील खड्डे चुकवत तारेवरची कसरत करतांना दिसत होते. शहरातील फिरोदिया हायस्कूल, न्यु आर्टस कॉलेज, सितारम सारडा, राधाबाई काळे महिला महाविद्यालयीन रस्ते चिखलमये झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.