चिंचवड : सुदर्शनगर येथील कमल सुपर मार्केट मध्ये किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरांनी दुकानातील गल्लाच चोरून नेला. सदर घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दुकानातील मालक भवरलाल गजाजी भाटी यांनी तक्रार नोंदविली आहे. याबाबत भाटी यांनी सांगितले आम्ही दररोज सकाळी ६ वाजता दुकान उघडतो. ९ तारखेला पहाटे पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान दुकानाचे शटर उचकटून चोरांनी प्रवेश केला. दुसरा चोरटा दुकानाबाहेर उभा होता तर तिसरा चोरटा दुचाकी (पल्सर) गाडीवर बसलेला होता. तिघा चोरटयांनी चेहरा बांधून घेतला होता.
चिंचवड पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्याकडे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण देण्यात आले आहे.