सचिन वाझे प्रकरणात क्राईम ब्रॅंचचीच झाडाझडती

-सचिन वाझे प्रकरणात एनआयएची कारवाई

  • वाझेंचा मोबाइल, लॅपटॉप, कागदपत्रे जप्त

-आणखी एका एपीआयची तिसऱ्या दिवशी चौकशी

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराभोवती सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात राष्ट्रीत तपास यंत्रणेने आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयावर छापा टाकला. या विभागातील अधिकाऱ्यांची त्यांनी चौकशी केली.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) 13 मार्चला अटक केली होती. ते या विभागात कार्यरत होते. दक्षिण मुंबईतील पोलीस मुख्यालयात हे कार्यालय आहे.
एनआयएने तेथून वाझे यांचे लॅपटॉप, आय पॅड आणि मोबाइल फोन तसेच काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. सोमवारी रात्री आठच्या सुमारास सुरू झालेली ही झाडाझडती, मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. सहाय्यक पोलीस आयुक्‍तांसह काही अधिकाऱ्यांचे जबाबही एनआयएने घेतले. या कार्यालयातील

सहायक पोलिस निरीक्षक रियाझुद्दिन काझी याची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली. काझी यानेच वाझे रहात असलेल्या ठाण्याच्या साकेत भागातील गृहनिर्माण संस्थांमधील सीसीटीव्हीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग नेले आहे. अंबानी यांच्या निावसस्थानाजवळील स्फोटकांची स्कॉर्पिओ सापडल्यानंतर दोन दिवसांनी ही कारवाई त्याने केली. मात्र, त्याची नोंद जमा मुद्देमालात नाही. त्यामुळे ते पुरावा नष्ट करण्यासाठी ही कृती केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.