पुणे – मॉडेलवर बलात्कार करून ब्लुफिल्म बनविण्याची धमकी देत 10 लाख रुपये खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या बॉलीवड फिल्म इक्विपमेंटच्या राजेश माल्ल्या याला अटकपूर्व जामीन मंजुर झाला आहे. दर रविवारी आणि पोलीस बोलावतील, त्यावेळी पोलीस स्टेशनला हजर राहण्यासह विविध अटींवर व्ही. ए. पत्रावळे यांनी हा आदेश दिला आहे.
माल्ल्यासह अभिजित साठे आणि एका महिलेवर वारजे पोलिसात या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. बलात्कार, फसवणूक, धमकाविणेसह विविध कलमानुसार हा गुन्हा दाखला आहे. या प्रकरणात माल्ल्या याने ऍड. चंद्रकांत कचरे, ऍड. महेश देशमुख, ऍड.विद्याधर भोसले, ऍड. निखिल गडकर आणि ऍड. योगेश ढमाल यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. माल्ल्या याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. सदर महिलेने केवळ पैसे उकळण्याच्या हेतून माल्ल्या याला या गुन्ह्यात गुंतविले आहे. तिने माल्ल्या याच्याकडून फिल्म इन्स्टिट्युट करिता लागणारे साहित्य उधारीवर घेतले आहे. त्याचे पैसे न देण्याच्या उद्देशाने खोटी केस केल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला.