पोटनिवडणुकीत राजेंद्र वाकचौरे विजयी

शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघात कॉंग्रेसची जोरदार मुसंडी
संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या प्रभाग 10 (अ) च्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे राजेंद्र कारभारी वाकचौरे यांचा 711 मतांनी विजय झाला. शिवसेनेच्या पारंपरिक प्रभागात कॉंग्रेसने विजय मिळवित जोरदार धक्का दिला.

शिवसेनेचे नगरसेवक लखन घोरपडे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने प्रभाग क्रमांक 10 (अ) ची पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात कॉंग्रेसचे वाकचौरे विजय झाले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभागामधील नागरिकांनी कॉंग्रेसला मोठे मताधिक्‍य दिले. दोन हजार 361 मतांपैकी कॉंग्रेसच्या राजेंद्र वाकचौरे यांना एक हजार 352, तर सेनेच्या कविता तेजी यांना 641, अपक्ष कन्हैया कागडे यांना 65, घनश्‍याम जेधे यांना 252 मते मिळाली. राजेंद्र वाकचौरे यांनी 711 मताधिक्‍याने दणदणीत विजयी मिळविला. नगरपालिकेत कॉंग्रेसचे 32 पैकी 30 संख्याबळ झाले आहे. वाकचौरे यांची मिरवणूक काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)