“लाल सिंग चढ्ढा’च्या युद्धातील सीन लडाखमध्ये

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक सिनेमे आणि सीरियलचे शूटिंगदेखील थांबवले गेले आहे. याच दरम्यान “लाल सिंग चढ्ढा’तील काही युद्धाच्या प्रसंगाचे शूटिंग लडाखमध्ये केले जाईल, असे आमीर खानने जाहीर केले आहे.

करोनाच्या नियमांचे पालन करत शूटिंग केले जाईल, असे आमीरने म्हटले आहे. त्याने लडाखला पोहोचलेल्या युनिटबरोबर लोकेशनची पाहणी करतानाचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. त्याच्या युनिटमधील अन्य सहकारी पीपीई किट घातलेले आहेत, तर स्वतः आमीरदेखील मास्क घालून लोकेशनची पाहणी करताना दिसतो आहे.

आमीर लडाखमध्ये 45 दिवस शूटिंग करणार आहे. काही दिवसांपूर्वी आमीरला करोनाचा संसर्ग झाला होता. बरा झाल्यानंतर तो क्‍वॉरंटाइनदेखील झाला होता. यामुळे आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे सिनेमाचे शूटिंग थांबले होते. आता शूटिंग पुन्हा सुरू केले जात आहे. “फॉरेस्ट गम्प’ चा रिमेक असलेल्या “लाल सिंग चढ्ढा’ मध्ये आमीरबरोबर करिना कपूरदेखील आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.