आंबेगाव मतदारसंघात कॉंग्रेसलाही हवाय आमदार

रांजणगाव गणपती – कॉंग्रेसचे शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष यशवंत पाचंगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे पाचंगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

याप्रसंगी शिरूर तालुक्‍यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी कौस्तुभ गुजर, महेश ढमढेरे, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, शिरुर तालुका अध्यक्ष वैभव यादव, आंबेगावचे तालुकाध्यक्ष राजु इनामदार, शिरुर तालुकाध्यक्ष यूएनएसआय विजय डिंबर यांचा तालुक्‍यातील विविध पदाधिकारी आदी उपस्थित यशवंत पाचंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आघाडीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र वरिष्ठ नेत्यांकडून जे दाखवले जात होते त्याला तडा गेला असून, शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्येही वळसे पाटलांना सेना-भाजप सारख्या विरोधकांबरोबरच आघाडीतील कॉंग्रेस पक्षाचा त्रास सहन करावा लागणार आहे. यशवंत पाचंगे यांना मानणारा मोठा तरुणवर्ग या मतदारसंघात असून, आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठा गोतावळा असल्याचे यशवंत पाचंगे यांनी यावेळी सांगितले. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण होण्यासाठी काम करणार असल्याचे पाचंगे यांनी यावेळी सांगितले. तसेच आता कसल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. “अभी नही तो कभी नही’ या भूमिकेमध्ये आपण कायम राहणार असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.