Pro Kabaddi 2024 (Gujarat Giants vs Puneri Paltan) : प्रो कबड्डी लीग (प्रो कबड्डी 2024) च्या 84 व्या सामन्यात पुणेरी पलटणने गुजरात जायंट्सचा 34-33 असा पराभव केला. या सामन्याचा निर्णय शेवटच्या रेडमध्ये झाला, ज्यामध्ये गतविजेत्याने बाजी मारली. यासह पुणेरी पलटन 47 गुणांसह तिसऱ्या स्थानावर तर जायंट्स 26 गुणांसह 10व्या स्थानावर पोहोचले आहेत.
अटीतटीचा सामना कसा जिंकायचा हे फक्त #PuneriPaltan ला माहीत आहे! 🧡#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #GujaratGiants pic.twitter.com/iIFCatnJpT
— ProKabaddi (@ProKabaddi) November 29, 2024
पहिल्या हाफनंतर गुजरात जायंट्स आणि पुणेरी पलटण यांच्यात 16-16 अशी बरोबरी राहिली. शेवटच्या 10 मिनिटांत सामना अधिकच रोमांचक झाला आणि पुण्याने हळूहळू गुण मिळवत अंतर कमी करण्यास सुरुवात केली. पुणे संघाने शेवटच्या मिनिटाला बरोबरी साधली आणि त्यानंतर सामन्याच्या शेवटच्या रेडमध्ये दादासो पुजारीने गुमान सिंगला टॅकल केले आणि गतविजेत्याने जबरदस्त विजयाची नोंद केली. गुजरातला केवळ एक गुण मिळाला आणि त्यांचा पराभव झाला.
Pro Kabaddi 2024 : हरियाणा स्टीलर्सनं गतविजेत्या पुणेरी पलटणला चारली पराभवाची धूळ…
गुजरात जायंट्ससाठी प्रो कबड्डी 2024 च्या या सामन्यात त्यांचा कर्णधार गुमान सिंगने सर्वाधिक 16 रेड पॉइंट घेतले. गुमानने आपल्या कारकिर्दीत 500 रेड पॉइंट्सही पूर्ण केले. पुणेरी पलटणचा नवा कर्णधार आकाश शिंदे यानेही सुपर 10 पुर्ण केले आणि 12 रेड पॉइंट घेतले.