७५व्या वर्षी देखील अक्षयच्या आईची ‘योग’ साधना

मुंबई : २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. त्याचेच औचित्य साधत बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच, ‘अक्षय कुमार’ने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. बॉलिवूड विश्वात देखील असे काही कलाकार आहेत जे नियमितपणे योग आणि व्यायाम करतात. आणि अक्षय कुमार देखील नेहमी फिटनेस जपणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या आईचा ‘अरुणा भाटिया’ यांचा फोटो शेअर केला असून, त्याखाली एक पोस्ट देखील लिहिली आहे. ‘मी एक असा फोटो शेअर करत आहे ज्याचा मला खूप अभिमान आहे. माझ्या आईचे ७५व्या वर्षी गुडघ्याचे ऑपरेशन झाले. त्यानंतर तिने योगसाधनेला सुरुवात केली. आता तिच्या आयुष्यात ‘योग’ हा अविभाज्य भाग झाला आहे. असे अक्षयने म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)