1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी दाऊदच्या दोन साथीदारांवर आरोपपत्र 

मुंबई – सन 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटमालिका प्रकरणी फरारी दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या दोन साथीदारांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यासीन मन्सूर मोहम्मद फारूख उर्फ फारूख टकला आणि अहमद कमाल शेख उर्फ लंबू अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर गुन्हेगारी कट आणि खुनासाठी टाडाखाली आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.

वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचे हे दोघे जवळचे साथीदार होते आणि बॉम्बस्फोटांच कट करण्यासाठीच्या गुप्त बैठकींना हजर राहत होते. फारुख याला गेल्या वर्षी मार्च महिन्यात दुबईमध्ये अटक करण्यात आली आणि नंतर भारतात आणण्यात आले होते. तर शेख याला जून महिन्यात अहमदाबादेतून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने मंगळवारी सुनावणी करण्याचे निश्‍चित केले आहे. 13 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण ठार झाले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.