मुंबई – सर्वांचे मनोरंजन करणारा, ‘बिग बॉस’चा सीझन 16 हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी नॉनफिक्शन टेलिव्हिजन रिएलिटी शो आहे. तसेच, गेल्या 12 वर्षांपासून सलमान खानने ह्या शो चे होस्टिंग केले असून, शो यशस्वी करण्यात सलमान खानची महत्वाची भूमिका आहे. ‘बिग बॉस’चे वैशिष्टय़ म्हणजे हा रिएलिटी शो देशातील सर्वात मनोरंजक आणि प्रसिद्ध चेहऱ्यांना एका छताखाली आणण्यासाठी ओळखला जातो. हा शो ‘बिग मनी गेम’ आहे यात शंका नाही.
दिवसेंदिवस या शोमधील रंगत वाढत चालली आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक त्यांच्या वागणुकीमुळे सध्या चांगलंच लक्ष वेधत आहेत. यात अभिनेत्री ‘प्रियांका चौधरी’ ही बिग बॉस 16 मधील टॉप स्पर्धकांपैकी एक असून, सध्या प्रियांकाचं या शो मधील मानधन देखील दुप्पट करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
कार्यक्रमाच्या सुरवातीला ‘इमली’ फेम सुंबूल तौकीरला सर्वाधिक फी मिळत होती. तिला आठवड्यासाठी 11 लाख रुपये मानधन मिळायचं. तर त्याचवेळी प्रियांकाचं मानधन पाच लाख रुपये होतं. मात्र, आता प्रियांकाच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. शोच्या सुरुवातीला 5 लाख रुपये मानधन घेणाऱ्या प्रियांकाचे आत्ताचे मानधन 10 लाख रुपये इतके करण्यात आले आहे. त्यामुळे आता मानधनाच्या बाबतील प्रियंकाने सुंबूल तौकीरला देखील मागे टाकले आहे.