‘स्मार्ट सिटी मिशन’मध्ये राज्यात पुणे पहिले तर देशात तेरावे

Madhuvan

पुणे – स्मार्ट सिटी मिशनमध्ये पुण्याचा नंबर राज्यात प्रथम तर देशात 13 वा आला आहे, अशी माहिती “पुणे स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिली. लॉकडाऊनआधी पुण्याचे स्थान देशात 17 वे होते.

प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती अद्ययावत करण्यानुसार केंद्र शासनाच्या वतीने रॅंकिंग करण्यात येते. स्मार्ट सिटीने प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा वेग वाढवला आहे. स्मार्ट सिटी योजनेतील नियोजित प्रकल्पांसोबतच करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्येही माहिती व्यवस्थापनात पुढाकार घेतला आणि कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वॉर रूम म्हणून अत्यंत प्रभावीपणे उपयोग केल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पुणे स्मार्ट सिटीने लॉकडाऊनपूर्वी सुरू केलेली कामे निरंतर सुरू ठेवली आहेत. करोना प्रतिबंधासाठी पुणे स्मार्ट सिटीने आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली (कचखड) प्रकल्पाअंतर्गत नवे डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. तसेच, कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून पुणे स्मार्ट सिटी कार्यरत असल्याचे डॉ. कोलते यांनी नमूद केले.

मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टम्स (एमआयएस) म्हणजे तंत्रज्ञान, संस्था आणि लोक यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणारी प्रणाली आहे. संस्था किंवा कंपन्यांना कर्मचारी, उपकरणे आणि व्यवसाय प्रक्रियेत समन्वय ठेवण्यास व क्रमवारीत एमआयएस प्रणाली साह्य करते. यातील माहितीच्या अनुषंगाने शहरांचे स्थान दिसते.

महाराष्ट्रातील शहरांचे राष्ट्रीय स्तरावरील मानांकन
पुणे- 13, नाशिक- 18, ठाणे- 22, नागपूर- 31, पिंपरी चिंचवड- 41, सोलापूर- 50, कल्याण डोंबिवली- 65, औरंगाबाद- 68

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.