सिंगापूरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 13 हजाराच्या पुढे

सिंगापूरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 13 हजारांचा पुढे

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना या विषाणूमुळे मृतांचा आकडा दोन लाखांच्या पुढे गेला असून 29 लाख 21 हजाराहून अधिक लोक संक्रमित आहेत. तर तर आठ लाख 36 हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत  मृतांची संख्या 54 हजारांच्या वर गेली असून नऊ लाख 60 हजारांहून अधिक लोक संक्रमित आहेत. सिंगापूरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 13  हजारांचा पुढे सिंगापूरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी सिंगापुरात 931 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 13   हजारांचा पुढे गेली आहे.  यात भारतीयांसह परदेशी नागरिकांची मोठी संख्या आहे. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये परदेशी नागरिकांनाच समावेश आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोरोनामुक्त
ब्रिटनचे पंतप्रधान सोमवारपासून कामावर परतणार आहेत. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना १२ एप्रिल रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत परराष्ट्र सचिव डॉमिनिक रॉब जबाबदारी सांभाळत होते. ब्रिटनमधील कोरोनाची एकूण प्रकरणे दीड लाखांपर्यंत पोहोचली आहेत. तर आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

दक्षिण कोरियामध्ये नवे १० कोरोनाबाधित रुग्ण
मागील २४ तर दक्षिण कोरियात नवे १० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दक्षिण कोरिया रविवारी आलेल्या आकडेवारीनुसार नऊ दिवसानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली आहे. कोरियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देहात आतापर्यंत १० हजार ७२८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ८ हजार ७१७ जण कोरोनमुक्त झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.