शिक्रापूर –
शिक्रापूरसह परिसरात शनिवारी (दि. 8) 19 जणांना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये शिक्रापुरमध्ये 6, विठ्ठलवाडी 2, धानोरे 1, तळेगाव ढमढेरे 1, सणसवाडी 4, डिंग्रजवाडी 2 तर कोरेगावात 3 असे एकूण 19 जण करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली. आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्ण राहत असलेल्या परिसरात निर्जंतुकीकरण केले आहे. सर्व करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याचे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. घोरपडे यांनी केले आहे.