शेवगावमध्ये विसर्जन वेळी पाण्यात पडून एकाचा मृत्यू;तर श्रीरामपूरमध्ये एक जण वाहून गेला

नगर –  अनिल विलास वाल्हेकर वय 23 रा शेवगाव हा मुलगा जोहरापूर येथे गणपती विसर्जन करताना नदीच्या पाण्यात बुडवून मरण पावला .तो नदीच्या पुलावर जेथे विसर्जन पॉईंट आहे तेथे विसर्जन न करता वेगळ्या रस्त्याने जाऊन नदीमध्ये विसर्जन करत होता.तो बुडल्यानंतर त्याला विसर्जन पॉईंट वरील कर्मचारी यांनी वाचवण्याचे प्रयत्न केले, त्याला पाण्याबाहेर कडून हॉस्पिटलमध्ये दाखल करताना त्याचा मृत्यू झाला.


दरम्यान,मौजे उक्कलगाव ता. श्रीरामपूर येथे प्रवरा नदी पात्रात गणपती विसर्जन करताना कु सौरभ विठ्ठल कर्डीले वय 17 वर्ष हा मुलगा वाहून गेला आहे। प्रशासन व नागरीक त्याचा शोध घेत आहेत, पोलीस घटनास्थळी पोहोचत आहे.श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सौरभ विठ्ठल कर्डिले वय 18 हा इयत्ता बारावीत शिकणारा मुलगा गणेश विसर्जनासाठी येथील प्रवरा नदीपात्रात उतरला असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

ही घटना ही सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली . त्याच्या सोबतच्या तरुणांनी आरडाओरड केली असता स्थानिक युवकांनी नदीत उडी घेऊन शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते. घटनास्थळी डीवायएसपी राहुल मदने, शहर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, बेलापूर आऊट पोस्टचे अतुल लोटके, गणेश भिंगारदिवे यांनी तातडीने घटनस्थळी दाखल होत तपास यंत्रणेने सूचना केल्या. श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील, कामगार तलाठी गवारी व स्थानिक पत्रकार व ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत नदी परिसरात तळ ठोकून असून गळ, टायरच्या माध्यमातून तसेच नावेच्या साह्याने शोधकार्य सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.