‘सिनियर सिटीझन’मध्ये ‘हा’ अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

मुंबई – सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवीन प्रयोग होत आहे. ‘पुष्पक विमान’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘देऊळ बंद’ लागोपाठ वैविध्यपूर्ण भूमिकांमधून अभिनेते ‘मोहन जोशी’ प्रेक्षकांसमोर आले होते. गेली अनेक र्वष हिंदी-मराठी चित्रपटांमधून मोहन जोशी यांनी विविध भूमिका रंगवल्या आहेत.

आता लवकरच आगामी ‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटातून मोहन जोशी प्रेक्षांसमोर येणार आहे. नुकतंच ‘सिनियर सिटीझन’ चित्रपटाचे अधिकृत पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, चित्रपटाच्या पोस्टर मध्ये मोहन जोशी यांचा हटके लुक दिसून येत आहे. त्यामुळे चित्रपटात त्यांची भूमिका काय असणार आहे? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

‘सिनियर सिटीझन’ हा चित्रपट अजय फणसेकर दिग्दर्शित असून ॐ क्रिएशन्सच्या माधुरी नागानंद, विजयकुमार नारंग यांची निर्मिती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.