सातारा जिल्ह्यात पीपीई किट घालून दुकान फोडले

सातारा: सातारा जिल्ह्यातील एका सराफाच्या दुकानात पीपीई किट घालून चोरट्यांनी दुकान फोडल्याची बाब समोर आली आहे. चोरट्यांनी या दुकानातून 780 ग्रॅम सोने पळवून नेले आहे. हा प्रकार फलटण गावात घडला.

चोरट्यांनी करोना उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या पीपीई किटचा वापर करून हा प्रकार केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून दिसून आले आहे. त्यामुळे त्यांचे चेहरे पूर्ण झाकले गेले असल्याने त्यांची ओळख पटणे मुष्किल झाले आहे.

चोरी करताना त्यांनी हातमोजेही वापरले होते असे यात दिसून येत आहे. दुकानाची भिंत फोडून ही चोरी करण्यात आल्याचे दुकान मालकाने पोलिसांच्या तक्रारीत म्हटले आहे. एकूण 780 ग्रॅस सोन्याच्या दागिन्याची चोरी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.