सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ८९३ रुग्ण गुरुवारी करोनामुक्त झाले. तर गुरुवारी रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार नवीन 800 जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. एकाच दिवसातील पाँझिटिव्ह रुग्णसंख्येपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या गुरुवारी जास्त राहिली. असे पहिल्यांदाच घडले आहे. जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमधून गुरुवारी संध्याकाळपर्यंत 893 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर 957 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 16, कराड उपजिल्हा रुग्णालय 24, फलटण उपजिल्हा रुग्णालय 56, कोरेगाव 111, वाई 121, खंडाळा 124, रायगांव 105, पानमळेवाडी 102, मायणी 53, महाबळेश्वर 35, पाटण 28, खावली 29 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 153 अशा एकूण 957 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील करोना स्थिती
घेतलेले एकूण नमुने –53628
एकूण बाधित — 21347
घरी सोडण्यात आलेले —13082
मृत्यू — 582
उपचारार्थ रुग्ण –7683