सातारा (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ८० जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले. बुधवारी सकाळी ५२ तर रात्री साडेनऊच्या सुमारास आणखी २८ रुग्णांचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ४२२ झाली आहे. जिल्ह्यात आज तीन करोनाबाधित व एक संशयित अशा चौघांचा म्रुत्यू झाला आहे.