सातारा जिल्ह्यात १३ जण पाँझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ८०४ वर

सातारा : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी १३ जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ८०४ झाली आहे. कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व पुण्यातील एनसीसीएस येथे तपासणी करण्यात आलेल्या १३ जणांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील ५८ वर्षीय पुरुष, दिघेवाडी येथील २४ वर्षीय महिला, धामणी येथील २१ वर्षीय तरुण, कराड तालुक्यातील चिखली येथील ६९ वर्षीय पुरुष, येळगाव येथील ४७ वर्षीय पुरुष, हिंगनोळे येथील ५४ वर्षीय पुरुष, तुळसण येथील ५०, ४५, ५४ व ७९ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, जावळी तालुक्यातील शिंदेवाडी येथील ३९ वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील सावली येथील २२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.