शिराळा : सांगली जिल्ह्यात रविवारी मनपा विभागात 172, शहरी विभागात 28, आणि ग्रामीण भागात 55 नवीन रुग्ण आढळून आलेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्या 4 हजार 706 वर पोहोचली आहे. आजअखेर बरे झालेले रुग्ण 2 हजार 54 आहेत. आज जिल्ह्यात उपचाराखाली 2 हजार 507 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 145 रुग्णांचा आजअखेर मृत्यू झाला आहे. रविवारी 116 रुग्ण कोरोना मुक्त ही झालेले आहेत.
आजअखेर मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2 हजार 902, शहरी भागातील 331, ग्रामीण भागातील 1 हजार473 अशी आहे, आज घेण्यात आलेल्या 859 टेस्टपैकी 128 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. अँटीजन टेस्ट 658 घेण्यात आल्या पैकी 134 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
तालुकानिहाय नवीन रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. आटपाडी 2, जत 3,कडेगाव 1, कवठेमहांकाळ 4, मिरज 28,शिराळा 5,तासगाव 5, वाळवा 12, सांगली 123, मिरज 49,पलूस 3, खानापूर 20, अशी आहे.
रविवारच्या अहवालातील मृतांमध्ये मिरज येथील 40, 75 वर्षीय पुरुष, व 65 वर्षीय महिला. सांगली येथील 71, 72, व 77 वर्षीय पुरुष. कुपवाड येथील 70 वर्षीय पुरुष. तासगाव येथील 67 व 65 वर्षीय पुरुष, असा समावेश आहे. पॉझिटिव्ह पैकी 200 रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
आज अखेरची तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे आटपाडी 188, जत 199, कडेगाव 90, कवठेमहांकाळ 165, खानापूर 95, मिरज 375, पलूस 157, शिराळा 223, तासगाव 126,वाळवा 186, मनपा 2 हजार 902 अशी आहे.
कोल्हापूर व सातारा येथील कोरोना स्थितीबाबत रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कराड येथे आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी टेस्टिंग वाढवणे, सतर्कता बाळगणे, मृत्यू दर वाढू नये यासाठी प्रयत्न सुरू करण्याचे प्रशासनाला सूचना देण्यात आल्या,