संगमनेरमध्ये महसूलची साडेसात कोटी वसुली

येत्या तीन महिन्यांत शंभर टक्‍के वसुली करणार : निकम

संगमनेर  – गेल्या नऊ महिन्यात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून 54.87 टक्‍के महसूल वसुली झाली आहे. 2019 – 20 या आर्थिक वर्षासाठी संगमनेर तालुक्‍याला महसूल विभागांतर्गत कर, इतर कर व दंडापोटी साडे 13 कोटी 50 लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत 7 कोटी 40 लाख रुपये वसुली झाली आहे. उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षी शंभर टक्‍के वसुली होणार असल्याचा दावा तहसीलदार अमोल निकम यांनी केला.

तालुक्‍यातील 172 गावांतर्गत आतापर्यंत तब्बल 7 कोटी 40 लाख रुपयांची वसुली केली आहे.चालू वर्षात 33 बेकायदेशीर वाळू वाहतूक व इतर प्रकरणात वाहने पकडून त्यांच्याकडून 36 लाख 33 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. विनापरवाना बांधकाम प्रकरणात 75 प्रकरणे महसूल विभागाने शोधून काढली आहे. 37 प्रकारणावरती दंडात्मक कारवाई करून तीन कोटी रुपयांची वसुली केली आहे. 34 प्रकरणाची दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

त्यामध्ये एक कोटी 45 लाख रुपयांचा दंड वसूल करणे सुरु आहे. तालुक्‍यात 147 मोबाईल अनधिकृत टॉवरवर कारवाई करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामध्ये 26 लाख रुपयांचा दंड वसुली होण्याची शक्‍यता आहे. शेतीमध्ये उभे केलेले टॉवर बिगर शेती करून न घेता बेकायदेशीर उभे केल्यामुळे हि कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. तालुक्‍यातील अनधिकृत वीटभट्ट्या, गौण खनिज आदि महसूल विभागाशी निगडीत असलेल्या प्रकरणातून हि दंडात्मक कारवाई सुरु असल्याने अनधिकृत कामे करणाऱ्यांकडून शासकीय वसुली सुरु आहे.

उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे नियमित आढावा बैठक घेऊन तलाठी, सर्कल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे महसूल विभागाने केलेल्या कारवाईमध्ये केलेल्या दंडाची रक्कम वेळेत भरली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करून अधिकच दंड वसूल केला जाईल.

अमोल निकम तहसीलदार संगमनेर 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.