संगमनेरमध्ये पुन्हा 14 कोरोनाबाधितांची भर ; रुग्णसंख्या 346 वर

संगमनेर : गेल्या बुधवारपासून संगमनेर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने सलग पाचव्या दिवशीही संगमनेरकरांना धक्का दिला आहे. शासकीय व खासगी प्रयोगशाळांकडून प्राप्त झालेल्या अहवालातून तालुक्यातील चौदा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या 346 वर जावून पोहोचली आहे.

संगमनेर तालुक्यात शनिवारी पुन्हा 7 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यात कुरण येथील 3 यामध्ये 30 वर्षीय महिला , 14 आणि 15 वर्षीय मुलीचा तर , गुंजाळवाडी येथील 3 यामध्ये 16 आणि 17 वर्षीय मुलांचा तर एका 32 वर्षीय महिलेचा समावेश आहे. शिबलापुर येथील एका 43 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय युवक, 21 वर्षीय तरुणी, व 50 वर्षीय व्यक्तीचा चा समावेश आहे.

संगमनेर शहरात मध्यवर्ती बाजारपेठ भागात एका 34 वर्षीय महिलेला, तसेच सराफ वाडा परिसरात 29 वर्षीय युवकाला, नाईकवाड पुरा 65 वर्षीय व्यक्तीला आणि वाघापूर गावातील 52 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी 14 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या 346 झाली आहे.

कोरोनाचा पराभव करुन ‘डेडीकेटेड कोविड केअर सेंटर’ मधून डिस्चार्ज घेतलेल्या शहरातील कुरणरोड भागातील इसमाचा आज सकाळी शहरातील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने तर मालदाडरोवरील महिलेचा अन्य आजारांवरील उपचारादरम्यान नगरमधील रुग्णालयात शुक्रवारी मृत्यु झाला. तालुक्यातील संक्रमितांची संख्या 346 झाली असली तरीही प्रत्यक्षात मात्र त्यातील केवळ 115 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. तालुक्यातील 210 रुग्णांनी यापूर्वीच उपचार पूर्ण करुन घर गाठले आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर व तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी आज बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या तसेच नागरिकांनी शासनाचे नियम व स्वयंशिस्त पाळावी असे आवाहनही केले.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर व तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत  यांनी आज बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी आ.डाॅ.सुधीर तांबे, प्रांताधिकारी शंशिकात मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बांगर, पंचायत समिती बीडीओ सुरेश शिंदे, डीवायएसपी रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील, वैद्यकीय अधिकारी संदिप कचोरीया आदिंसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.