ग्रामीणमध्ये करोनाबाधित दर सहा टक्‍क्‍यांखाली; आणखी चाचण्या, निर्बंधांची गरज

पुणे  -ग्रामीण भागातील आठवडानिहाय करोना बाधित दरामध्ये घट झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत हा दर 5.4 टक्के नोंदवण्यात आला आहे. सुमारे महिनाभरानंतर हा दर दोन टक्‍क्‍यांनी घटला आहे. 

मात्र, हा दर तीन टक्‍क्‍यांखाली आणण्यासाठी जिल्हा परिषद, नगरपरिषद यांना अजून नमुने तपासणी आणि कडक निर्बंध याची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.

ग्रामीणमध्ये दि.13 ते 19 मे दरम्यान सर्वाधिक 22 टक्के बाधित दर होता. 88 हजार 165 नमुने तपासणीतून 19 हजार 362 बाधित सापडले. त्यानंतर हा बाधित दर प्रत्येक आठवड्याल तीन ते चार टक्‍क्‍यांनी घटला.

मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून वेगाने खाली येणारा बाधित दर संथ झाला. 3 ते 9 जून रोजी ग्रामीणमधील बाधित दर 8.9 टक्के होता महिना अखेरीस हा दर 7.3 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला. जुलैमध्येही त्यामध्ये फारशी घट झाली नाही.

मात्र, जुलैच्या अखेरीस बाधित दर दोन ते अडीच टक्‍क्‍यांनी कमी झाला. त्यामुळे ग्रामीणला दिलासा मिळाला, परंतू तो समाधानकारक नाही.

ज्यावेळी बाधित दर 3 टक्कयांच्या खाली येईल, त्याचवेळी करोनाची दुसरी लाट ग्रामीणमध्ये ओसरली असे म्हणता येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.