सविंदणे (प्रतिनिधी)- श्री गुरुदेव दत्त विदयालय सविंदणे ता. शिरूर येथील बारावीच्या निकालांमध्ये पहिल्या एक ते अकरा क्रमांकात मुलींनीच बाजी मारल्याचे व मुले मात्र अभ्यासात मागे असल्याचे दिसून येत आहे.
सविंदणे येथील श्री गुरूदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून, यामध्ये नेवकर काजल कैलास (81.38), बिश्वास तनुजा बिनयकुमार (80.92) शेटे प्राजक्ता सीताराम (78.00) त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन करून विद्यालयाची शंभर टक्के यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य सी. एन.औटी, डॉ. अजित कोकरे, विकास शिंदे, वैशाली बेल्हेकर, भरत थोरात, अविनाश महामुनी, शंकर गोफणे, सोनाली लंघे, कविता मोरे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यमान सरपंच संतोषशेठ मिंडे, वसंत पडवळ, बाळासाहेब पडवळ व आजी -माजी सरपंच , सर्व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.