रीवा : मध्य प्रदेशातील रीवा येथे जमिनीच्या वादातून एका बीएसएफ जवानाने आपल्याच आई-वडिलांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी बेरोजगार भावाला जमीन दिल्याचा राग मनात धरत जनावाने हे कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण मध्य प्रदेशातील रेवा येथील पंडारिया गावातील आहे. विशेष पांडे (वय 30) असे या जवानाचे नाव असून तो 10 दिवसांपूर्वी दिवाळीच्या सुट्टीवर घरी आला होता. जवानाचे वडील अंबिका पांडे यांनी जमिनीच्या वाट्यात आपल्या लहान भावाला अधिक जमीन दिली होती. काकाला अधिक जमिन देण्यासाठी जवानाने विरोध केला होता. तेव्हा वडिलांनी सांगितले की, काका अनेकदिवसांपासून बेरोजगार होते. जमिनीसाठी वाद नका करू यावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, जवानाने त्याच्या खोलीतून परवाना असलेली बंदूक आणली. या बाचाबाची मध्ये वडिलांना गोळी लागली, यावेळी जवानाची आई शिला पांडे बचावासाठी आली असता त्याने आईवर सुद्धा गोळ्या झाडल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार मंगळवार रोजी संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान घडला आहे. यावेळी जवानाने तीनवेळा गोळीबार केला. वडिलांच्या पायाला दोन गोळ्या व आईच्या हाताला एक गोळी लागली आहे. विशेषचे वडिल सुद्धा सेनेत होते. या घटनेनंतर जवान फरार आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.