नवी दिल्ली – राजस्थानातील कॉंग्रेस सरकारच्या विरोधात बंड पुकारणारे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यवर काँग्रेसने थेट कारवाई केली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन बाजूला हटवले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी तीन मंत्र्यावर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी हा निर्णय जाहीर केला.
Sachin Pilot removed as Deputy Chief Minister, announces Congress leader Randeep Singh Surjewala #Rajasthan pic.twitter.com/5tj3TJxZe8
— ANI (@ANI) July 14, 2020
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्षपदावरुनही हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता गोविंद सिंह डोटासरा यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. सचिन पायलट यांच्यासह तीन मंत्र्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. आज जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची दुसरी बैठक झाली. या बैठकीला सचिन पायलट अनुपस्थित होते. त्यानंतर आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर रणदीप सूरजेवाला यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय जाहीर केला.
#WATCH Congress party has decided to remove Sachin Pilot as Deputy CM and Rajasthan PCC Chief. Vishvender Singh & Ramesh Meena removed as Ministers: Congress leader Randeep Singh Surjewala #Rajasthan pic.twitter.com/sJHmE9kI3T
— ANI (@ANI) July 14, 2020
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबरोबरच अहमद पटेल, पी.चिदंबरम आणि के.सी.वेणुगोपाल हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पायलट यांच्याशी संपर्क ठेऊन होते. त्यांनी पायलट यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सचिन पायलट यांनी मात्र आपला बंडाचा पवित्रा कायम ठेवला आहे. सचिन पायलट हे अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. तथापि आपण भारतीय जनत पक्षात प्रवेश करणार नाही असे त्यांनी काही राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांशी बोलताना सांगितले. ते बहुधा स्वतंत्र प्रादेशिक पक्ष स्थापन करणार आहेत असे सांगितले जात आहे. त्यांनी आपल्या मागे कॉंग्रेसच्या तीस आमदारांचा गट असल्याचे नमूद केले असून गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावाही पायलट यांनी केला आहे.