सलमानचा मोस्ट अवेटेड “राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ला सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही कट शिवाय पास केले. मात्र सलमान खानने स्वतःलाच या सिनेमा तील 21 सीनमध्ये दुरुस्त्या केल्या आहेत. एका दृश्यात लहान मुलगा ड्रग्स घेताना दाखवले होते. त्याचे सहा दृश्ये काधून टाकली गेली आहेत. “राधे’ला सेन्सॉर बोर्डाने यु/ ए सर्टिफिकीट दिले आहे.
म्हणजे 8 ते 14 वर्षांदरम्यानची मुलेही हा सिनेमा बघायला येणार. त्यांच्या समोर ड्रग्जचे दृश्य दिसायला नको, म्हणून सलमानने ही दुरुस्ती केली. याशिवाय पोलीस स्टेशनच्या बाहेर येत असलेला अजानचा आवाज काढून टाकला गेला आहे.
स्वच्छ भारत समर्थन करताना “स्वच्छ मुंबई’ चा उल्लेख बदलून ‘स्वच्छ भारत’ असा उल्लेख केला गेला आहे. “राधे’ संपूर्ण देशभर दाखवला जाणार आहे. त्यामुळे सर्व देशाचा संदर्भ जोडण्यात आला आहे. सलमान खानने स्वतःच या दुरुस्त्या केल्या आहेत. त्यामुळे त्याला महत्त्वही तेवढे आहे.