पुणे – आज पुण्यातही हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात धर्मांतर आणि लव जिहादविरोधी कायद्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. याच प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील विविध शहरांमध्ये जोरदार आंदोलनेही करण्यात आली होती. यामध्ये साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले सुद्धा सहभागी झाले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की,’छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत. महापुरूषांवर बोलण्याएवढे आपण मोठे नाही, त्यावर बोलू नये, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच या मागण्या पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवणार” असेही ते म्हणाले आहे.
पहा व्हिडिओ