पुणे – शहरात मागील चोवीस तासांत 5 हजार 651 नवीन करोना बाधित आढळून आले असून, 4 हजार 361 रुग्ण बरे झाले आहेत. 54 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 13 जण महापालिका हद्दीबाहेरील आहेत. दरम्यान, शहरातील आतापर्यंतच्या बाधितांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
शहरातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 46 हजार 71 झाली आहे. शहरात सध्या 957 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.
8 फेब्रुवारीपासून 1 लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. शहरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 3 लाख 5 हजार 372 झाली असून, त्यापैकी 2 लाख 53 हजार 734 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत 5 हजार 567 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.