पुण्यात ‘वंचित’ची आघाडी 64 हजारांवर

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या अनिल जाधव यांना सर्व फेऱ्यांमध्ये मिळून सुमारे 60 हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजप कॉंग्रेस नंतर तिसऱ्या स्थानावर वंचित आघाडीला स्थान मिळाले आहे. वंचित आघाडीला सर्व फेऱ्यांअखेर ….. मते मिळाली आहेत.

वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपले उमेदवार उभे केले होते. जागावाटपावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याला त्यांनी नकार दिला आणि त्यांनी एमआयएमबरोबर आघाडी केली होती. पुण्यामध्ये त्यांनी अनिल जाधव यांना उमेदवारी दिली होती.

कसबा विधानसभा मतदार संघ वगळता वंचित आघाडीला अन्य विधानसभा मतदार संघात शेकड्यांनी मते पडली आहेत. त्यामुळे वंचित आघाडीने चांगलीच “फाईट’ देत सुमारे 60 हजारांपेक्षा जास्त मते मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवाराच्या मतांची तुलना केली असता, तिसऱ्या क्रमांकावरील मते वंचित आघाडीला मिळाली आहेत, ही विशेष लक्षणीय बाब आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.